अतिवृष्टी होऊनही डोणगाव मंडळ अतिवृष्टीच्या यादीत नाही

औरंगाबाद (प्रतिनिधी समीर शहा) : तहसीलदार गंगापूर यांनी नुकत्याच ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात डोणगाव मंडळातील गावांचा समावेश नसल्याचे आज निदर्शनास आले. डोणगाव मंडळाचे पर्जन्यमाप ज्या यंत्राच्या साह्याने तपासले त्या यंत्राची दशा व दुर्दशा पाहता ते यंत्र प्रजन्यमान योग्य पद्धतीने मोजेल असे वाटत नाही.

संबंधित अधिकारी वर्गाने नेमक प्रजन्यमान कसे मोजले यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .निष्काळजी अधिकारी वर्गामुळे व गलिच्छ कारभारामुळे डोणगाव मंडळातील अनेक गावे व हजारो शेतकर्यांच्या मुळावर आणखी एक संकट उभे राहिले आहे .

dongaon-grampanchayat

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही शासनाच्या शुल्लक चुकीमुळे शेतकरी बांधव अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार आहे यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तसेच डोणगाव मंडळातील गावे अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ट होत नाही तोपर्यंत शेतकर्यां समवेत उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत सदरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असे आवाहन धामोरी खुर्द येथील उपसरपंच रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे त्यांच्यासमवेत यावेळी भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील जाधव ,वाल्मीक वाकळे, राम तुपे, दत्तू पाटील कराळे सह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here