भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावरील वेबिनारला प्रतिसाद

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंक नाद ‘ अ‍ॅपचा पुढाकार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर ११, १२ सप्टेंबर रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.हे तेरावे आणि चौदावे सत्र होते.त्यात गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी ‘ त्रैराशिक ‘ , ‘पंचराशी’ या विषयावर मार्गदर्शन केले.वर्षभर हा वेबिनार उपक्रम चालणार आहे.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘ अंक नाद ‘ अ‍ॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.वैशाली लोखंडे,समीर बापट इत्यादी उपस्थित होते.

आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here