चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : तालुक्यातील खेडी भोकरी येथे कोविड लसीकरणाच्या वेळी नंबर वेळेवर न लागल्याने एकाने मद्य प्राशन करून महिला सरपंचांना शिविगाळ केल्या प्रकरणी अडावद पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
खेडी भोकरी येथे महिला सरपंचला कोविड 19 लसीकरणावरून नंबर लावण्यावरुन घरी जाऊन शिविगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी गोरख मधुकर कोळी(.वय.30.धंदा दारू विक्री) यांनी दिली यामुळे सरपंच यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात अडावद पो.स्टे ला रा.का.रजि.न.533/2021भागवि क्र.504 .506 .510.प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.






