जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील बिजासनी जिनिंग विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मा.नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले धरणगाव येथील उद्योगपती मा.नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी हे पालकमंत्र्यांचे मार्गदर्शक आहेत आपन त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दयावी.
ना गुलाबरावजी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले सुरेश नाना हे शिवसेनेचे निष्टवान कार्यकर्ते असून मी आमदार ते मंत्री पदापर्यंत पोहचण्यात त्यांचे अनमोल सहकार्य आहे. मागील वेळेस त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती परंतु युती असल्यामुळे त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती. ह्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने आघाडीने शिवसेनेला सहकार्य केले तर सुरेश नाना चौधरी यांना आम्ही निवडून आणू शकतो असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रा आर एन महाजन,प्रा डी आर पाटील, काँग्रेसचे नेते डी.जी पाटील, गुलाबराव वाघ, प्रा बी एन चौधरी,भानुदास आप्पा विसावे, संजीवकुमार सोनवणे,जीवन आप्पा बयस, अजय सेठ गुजराथी व नेत्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले नगराध्यक्ष निलेश चौधरी न पा नगरसेवक,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरणअग्निहोत्री यांनी केले.






