इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्यावतीने इचलकरंजी मेन रोड मलाबादे चौकामध्ये सायंकाळी साडे पाचच्या सुमारास किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन करून प्रतिमेस जोडे मारून व किरीट सोमय्या यांच्या विरोधात तीव्र घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. ना.मुश्रीफ यांच्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून त्यात काही तथ्य नाही असे मदन कारंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार राजीव आवळे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील,बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, नितीन कोकणे, मंगेश कांबुरे, अमित गाताडे,नागेश शेजाले, दीपक नेर्लेकर, मच्छिंद्र नगारे, किरण माळी, सादिक जमादार, निखिल जमाले, अमित कांबळे, आनंद कांबळे, अभिजीत रवंदे, संकेत बागल, विवेक चोपडे, अनिल वराळे, संभाजी अण्णा सूर्यवंशी, युवराज जाधव, अथर्व जाधव, विकास मकोटे,निशिकांत पाटील, या व्यतिरिक्त राष्ट्रवादी पार्टीचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

rastrawadi-congress-ichalkaranji

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here