सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट मदत जमा करावी; खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद मध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती होती. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक नष्ट झाले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान तर झालेच आहे. त्या सोबतच अनेकांच्या घराची पडझड झाली आहे.

या गंभीर परिस्थितीत व एकामागून एक येणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. त्यामुळे सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता येत्या ३ दिवसाच्या आत सर्वांच्या खात्यात सरसकट मदत जमा करावी, अशी मागणी खुलताबाद तालु्क्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here