इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधा त्मक उपायोजना त्याचबरोबर नागरिकांची गर्दी होवु नये याकरिता देणेत आलेल्या शासनस्तरावरील सुचनेनुसार मंगळवार दि.१४ सप्टेंबर रोजी असलेल्या घरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी नागरिकांची गर्दी होवु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ३० ठिकाणी कृत्रीम गणेश मूर्ती विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था करणेत आलेली होती. नरपरिषदेच्या वतीने ठेवणेत आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेचा इचलकरंजी शहरवासीयांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
मंगळवारी दिवसभरात इचलकरंजी शहरातील नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जवळपास ९६०६ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खण येथे करून तसेच ९०५२ किलो निर्माल्य जमा करून नगरपरिषदेने शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.
आजच्या या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्याकरिता नगरपरिषदेच्या २ यांत्रिक बोटी, १ अग्निशमन वाहन, १५ आयशर टेंपो, ६ डंपर यासह नगरपरिषद उपमुख्याधिकारी, कामगार अधिकारी नगरअभियंता,आरोग्य अधिकारी, सर्व विभाग प्रमुख,शाखा अभियंता, उप शहर अभियंते , स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी यांचेसह जवळपास ४०० अधिकारी-कर्मचारी ,५० स्वयंसेवक संपूर्ण दिवस कार्यरत होते तसेच या सर्व यंत्रणेवर मुख्य अधिकारी पुर्णवेळ लक्ष ठेवून होते.
नगरपरिषदेकडून करणेत आलेल्या या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देवुन सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार आणि मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल तसेच सर्व पदाधिकारी यांनी शहरवासीयांचे आभार व्यक्त केले आहे.






