बुलंद पोलिस टाईम्स बातमीचा दणका : अखेर कर्जत पोलिसांची जुगार अड्डयावर कारवाई

जुगार अड्ड्यावरून १ लाख ११ हजार ३४० रुपये जप्त

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या अवैध जुगारअड्डा सुरू असल्याचे बुलंद पोलिस टाईम्स या वेबपोर्टलवर वृत्त प्रसिद्ध होताच कर्जत पोलीसांना अखेर जाग आली. त्यानंतर जुगार अड्डयावर छापा टाकून १३ जणांवर ही कारवाई केली असून त्यांचे कडून १ लाख ११ हजार ३४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असली तरी शहरात व आजुबाजूच्या परिसरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे त्या ठिकाणी शोधमोहीम सुरू कारवाई करण्याची मागणी होत आहे

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुगाराचा अड्डा सुरू आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी ७.५५ वा. सुमारास मौजे – पाटील आळी येथे कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस हवालदार सुभाष पाटील, पोलिस नाईक सचिन नरूटे, पोलिस शिपाई भुषण चौधरी, पोलिस शिपाई आश्रुबा बेंद्रे, पोलिस शिपाई गणेश पाटील यांनी धाड टाकली.पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांवर कारवाई केली आहे. हे सर्व कर्जत तालुक्यातील मुद्रे येथील राहणारे आहेत. सदर गुन्ह्यातील एकूण १ लाख ११ हजार ३४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 245/2021 जुगार अधिनियम, 1867, कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here