जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते तात्काळ दुरुस्त करावेत, अशी लेखी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी केली आहे.
धरणगाव येथील उड्डाणपुलावर अनेक दिवसापासून खड्डे झाले असून ते वाढतच असून त्याचे प्रमाण यापेक्षा जास्त होऊन अपघात होऊन अनुचित प्रकार घडू शकतो. सर्वात जास्त रहदारीचा हा उड्डाणपूल असून छोटे-मोठे अपघात यापूर्वी झाले आहेत परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही वेळोवेळी संबंधित बांधकाम विभागाला तोंडी मोबाईलवर पूर्वकल्पना देऊन सुद्धा पावसाचे कारण दाखवून खड्डे अद्याप बुजवले गेले नाहीत.

वाढत्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा चारचाकी गाड्या खड्ड्यात अडकून बंद पडतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अनेक ट्रक ड्रायव्हर व चारचाकी गाड्या उड्डाणपुलावर पार्किंग केलेल्या असतात अशा गाड्यांवर सुद्धा कार्यवाही करावी तसेच उड्डाणपुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी दिला आहे.






