शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.भाग्यश्री बानाईत मॅडम यांचा सत्कार साई संस्थान एम्प्लॉ. सोसायटीचे मार्गदर्शक तथा सन्मा.खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी अपघाती निधन झालेले श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी कै.बाबुराव दत्तात्रय खाडगीर त्यांच्या वारसास मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आणि खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. यांच्या हस्ते साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे वतीने रुपये-10,00000/- (रुपये-दहा लाख)अपघाती विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री. शिवाजीराजे गोंदकर पा.साई संस्थान एम्प्लॉ. सोसायटीचे विद्यमान चेअरमन सौ. श्रद्धाताई कोते पा., प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, तसेच संचालक श्री.तुषारदादा शेळके पा.,श्री.जितेंद्र गाढवे पा.श्री.प्रताप कोते पा., संस्थेचे सहसचिव श्री. विलास वाणी पा, व इतर कर्मचारी उपस्थित होते.






