जे. टी. महाजन अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात साजरा

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) : फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकीत महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून जे. टी. महाजन इंजिनीरिंग कॉलेज फैजपूर येथे ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

अभियंता दिनानिमित्त जे. टी. महाजन इंजिनीरिंग कॉलेज येथे सोशल व इथिकल इंजिनिअरिंग या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या ऑनलाइन वेबिनारला गोखलेज अॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगावचे प्रमुख इंजि. देवदत्त गोखले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जी ई चौधरी यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना आपण मिळवलेली डिग्री ही फक्त कॉर्पोरेट जगतात प्रवेश करतानांची एन्ट्री पास आहे असे सांगताना डिग्री सोबतच तुम्ही मल्टी स्किल्स आत्मसात करायला पाहिजे असा सल्ला दिला. याप्रसंगी भावी अभियंत्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य यांचा वापर मानवी जीवन कल्याणासाठी करावा असे याबाबत देवदत्त गोखले यांनी सखोल माहिती दिली. या वेबीनारमध्ये त्यांनी प्रामुख्याने आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी अभियंत्यांचा सहभाग जबाबदारी आणि योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली.

यासोबतच त्यांनी भावी अभियंत्यांना आपल्या सामाजिक आणि नैतिक जबाबदारीची जाणीव सुद्धा करून दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ एन डी नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेबिनारला महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन डॉ. पी. एम. महाजन, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. आभार डॉ. जी. ई. चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here