जागतिक अभियंता दिनी जळगावातील रस्ते बनविणारे अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश पाटील) : आज जागतिक अभियंता दिन असल्याने सोशल मीडियावरून जगभरातील सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र जळगाव शहरातील मनपा प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच रस्त्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाल्याने जळगावकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून जळगावातील रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरत ट्रोल केले आहे.

जळगावातील रस्ते बनविणारे इंजिनियर सोडून बाकी सर्वांना जागतिक अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाच्या शुभेच्छा अनेक जळगावकरांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बरोबरच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आज दिवसभर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले आहेत.

social-media-post-on-jalgaon-road

शहराील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा व त्यामुळे होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीचा जळगावकरांना सामना करावा लागत असल्याने हे रस्ते बनविणारे अभियंते नेमकी काय पद्धतीने व गुणवत्तेने येथील रस्ते बनवितात असा सवाल उपस्थित करीत जळगावकरांनी आज जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील खड्डेमय रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोडून इतर सर्व अभियंत्यांना जागतिक अभियंता दिनाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here