चोपडा (प्रतिनिधी अनंत चौधरी) : आज रोजी अमरावती येथे 20 वी जुनीयर राजस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 चे आयोजन दिनांक 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत टेनिस बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत पार पडल्या त्यांचे आयोजन अमरावती जिल्हा टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन..यांनी मिर्झा महाविद्यालय,अमरावती येथे केले असता त्या ठिकाणी 10 जिल्ह्याचा समावेश होता
त्यामध्ये आपल्या अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब, चोपडा येथील मुलींचा संघ उपविजेता झाला. त्याबदल सर्व संघाचे व त्यांचे प्रशिक्षक -*मनोज जाधव,अरविंद जाधव व टीम मॅनेजर म्हणून ललित सोनवणे, विजय पाटील,अमोल डुडवे यांचे खुप खूप अभिनंदन व अष्टविनायक परिवारातील सर्व पदाधिकारी व सर्व प्रशिक्षक वर्ग यांनी विजयी संघाचे अभिनंदन व कौतुक केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुढील 22सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2021 या काळात जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीसाठी आपल्या या संघाचे मुली महाराष्ट्राचे नेतृत्व करतील.

पुढील 22सप्टेंबर ते 26सप्टेंबर 2021या काळात जम्मू काश्मीर येथे होणारे राष्ट्रीय पातळी साठी या संघाचे मुली महाराष्ट्राचे नेतृत्व करतील.तसेच कर्णधार म्हणून कार्तिकी अनंत चौधरी ची निवड केली. संघात कार्तिकी चौधरी(कर्णधार), कामिनी पाटील, वैष्णवी पाटील, गार्गी पाटील, शरयू बाविस्कर, प्राजक्ता चौधरी,पूजा पाटील,प्रतिभा कोळी,एकता दहाड, वेधश्री पाटील,अंकिता पाटील,योगिता पाटील यांचा समावेश आहे.






