जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असून भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असे बेताल वक्तव्य केले.
त्याच्या या वक्त्यव्याच्या निषेधार्थ बुधवार दि. १५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे प्रवीण दरेकर विरोधी घोषणा देत हाय हाय, दरेकरांचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणाबाजी त्यांच्या फोटोवर शाई फेकून, जोडे मारून महिला शहर जिल्हाध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. प्रवीण दरेकर यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान सहन करणार नाही. बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, असा इशारा दिला आहे.
या आंदोलना प्रसंगी सामाजीक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष कल्पना अहिरे, मिनाक्षी चव्हाण, निरिक्षक शालीनी सोनवणे, कार्याध्यक्ष,आशा येवले, सुमन बनसोडे, दिपीका भामरे, मिनाक्षी शेजवळ, पिनाज फनीफंदा, अँड. निशा निंबाळकर, निलाक्षी साठे यांची उपस्थिती होती.






