जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव शहरात उड्डाणपुलापासून ते चोपडारोड खोलपाट पर्यंत काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत परिणामी अपघाताचे प्रमाणात वाढ झालेली आहे. या रस्त्यांची किमान डागडुजी करावी अशी मागणी करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी सा.बां. कार्यालयात गेले असता, नेहमीप्रमाणे येथे अधिकारी न आढळून आल्याने, पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या खूर्चीलाच निवेदन दिले.
यापूर्वीही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागातात तक्रार करण्यास गेले असता त्याठिकाणी कोणताही अभियंता मिळून येत नाही तसेच श्री.ठाकूर यांना भाजपच्या नगरसेवकांनी व नागरीकांनी फोनवर सूचना करून सुद्धा ते अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही तर भारतीय जनता पार्टी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर विषयाची तक्रार व निवेदन देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी बुधवार (दि.१५) गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठाकूर कार्यालयात मिळून आले नाही त्यासाठी त्यांच्या खुर्चीला निवेदन देण्यात आले.या बेशिस्त अधिकारी व अभियंता याच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या करण्यात येईल तसेच कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याची देखील तयारी भारतीय जनता पार्टी करेल.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,पुनीलालअप्पा महाजन,अँड.वसंतराव भोलाने,सुनील पाटील सरशहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,शरद अण्णा धनगर,गुलाब मराठे,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, वासुदेव महाजन,सचिन पाटील,सुदाम मराठे,जुलाल भोई,जितेंद्र चौधरी, रवी पाटील,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.






