तांबापुरा घरफोडीचा गुन्हा उघडकीस; अल्पवयीन आरोपी ताब्यात

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील तांबापूरा व फुकट पुरा भागात घरफोडीचा गुन्हा घडला होता. या गुन्हात सरफराज खान पठान यांच्या घरातील ६८ हजार रूपयांचा मुद्दे माल चोरीला गेला होता. या गुन्हातील एक अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा मागावर आहेत.

या गुन्हातील आरोपी मेहरूण तलावाच्या जंगल परिसरात लपून बसल्याची महिती मिळालेल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथक रवाना झाले. आरोपींचा शोध घेत असतांना एक अल्पवयीन पथकाच्या हाती लागला. त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून ६१ हजार रूपयांच्या मुद्देमाल काढुन दिला आहे. पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलाचा साथीदार सोनू सलीम शेख, रा. फुकट पुरा हा पोलीसांचा सुगावा लागताच पसार होण्यात यशस्वी झाला असून, लवकरच त्याला ताब्यात घेतले जाणार असल्याचा विश्वास तपास पथकातील कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.

ताब्यातील अल्पवयीनास बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर या पूर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, यांनी तयार केलेल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाइक सुधीर साळवे, पोलिस नायक इमरान सैयद, मुदस्सर काझी, पो.कॉ. गोविंदा पाटिल, व सचिन पाटील यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास मुदस्सर काझी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here