पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकानं बंद राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit-pawar

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र घरगुती गणपती आणि गणरायाचं बाहेरून दर्शन घेण्यासाठी नागिरक गर्दी करू लागले आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातही गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीही शहरात गर्दी झाली होती. त्याच अनुषंगाने अजित पवारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अनंत चतुर्दशीला पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दिवसभर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत, तसेच औषधांची दुकानं आणि दवाखाने सुरु राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here