रिक्षा भाड्याने देण्यास नकार दिल्याने चालकास बेदम मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : रिक्षा भाड्याने देण्यास नकार दिल्याने दोघांनी मिळून रिक्षा चालकाच्या डोळ्यात जळजळ होणारी पावडर टाकून लोखंडी हत्याराने मारहाण केली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी किवळे ब्रिज खाली, किवळे येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलाब महंमद मुनीर खान (वय ३४, रा. कसबा पेठ, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रियाज सय्यद (रा. कोंढवा, पुणे) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना रिक्षा भाड्याने मागितली, मात्र फिर्यादी यांनी रिक्षा भाड्याने देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या डोळ्यात जळजळ होणारी पावडर टाकली आणि लोखंडी हत्याराने डोक्यात, चेह-यावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here