भावाचे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी जात असतांना दोघा सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : दारुचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील गॅरवारे पॉईंटसमोर उड्डाणपुलावर घडली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इगतपुरी येथील गोरख लक्ष्मण जाधव (वय ३५), सोमनाथ लक्ष्मण जाधव (२५) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमनाथ जाधव यास दारुचे व्यसन आहे. ते सोडवण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोघे इगतपुरीहून वणीला दुचाकी (एमएच १५-डीपी-४२१४)वरुन गेले होते. वणीत व्यसनमुक्ती करणार्‍या व्यक्तीस भेटल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. दोघे दुचाकीवरुन गरवारे पॉईंटसमोरील उड्डाणपुलावर आले. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here