हिंगोली (प्रतिनिधी) : राज्यातल्या विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना येथे १२ वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी विकृताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित १२ वर्षीय मुलगा (रा. गोरेगाव) हा अल्पवयीन, अंध आदिवासी तसेच दिव्यांग आहे. आरोपीला माहिती असूनही त्याने मुलाला शेतात नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारातील ही घटना घडली. हिंगोलीतल्या सेनेगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे.






