काबूल : तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तालिबान सरकारने एक अजब नियम केला आहे. महिलांच्या मंत्रालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांनाच कामावर येण्यापासून तालिबानने रोखले आहे. या मंत्रालयात केवळ पुरुषांनाच काम करण्याची परवानगी दिली आहे.
तालिबानने सत्तेवर आल्यानंतर महिलांना शिक्षण आणि रोजगाराची संधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिलांच्या रोजगारांवर गदा आणण्याचे काम तालिबानने सुरू केले आहे.
ज्या ठिकाणी पुरुष कर्मचारी असतील, तेथे महिला काम करू शकणार नाही, असा फतवा तालिबानने काही दिवसांपूर्वी काढला होता. आता तर महिलांच्या मंत्रालयातच महिलांना कामावर येण्यापासून रोखण्यात आले आहे.
राष्ट्रीय व अंतर विद्यापीठ हॉकी खेळाडू चंदन ठाकूर याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
अकोला (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका निष्णात हॉकीपटूचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चंदन ठाकूर असं हॉकीपटू खेळाडूचं नाव आहे. नदीच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्हातील उत्कृष्ट राष्ट्रीय व अंतर विद्यापीठ हॉकी खेळाडू चंदन ठाकूर याचा नंदापूर येथील नदीत बुडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या नंदापूर येथे चंदन मामाच्या घरी गेला होता. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाल्याचे सांगण्यात आले.






