श्री साईबाबा संस्थानच्या कायम कंत्राटी इंसोर्स आउटसोर्स कर्मचाऱ्यांना मागीलप्रमाणे पन्नास टक्के वेतन देण्याची मागणी

भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात यांना पत्र

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबा संस्थान शासनाच्या आदेशानुसार दि.०५/०४/२०२१ पासून मंदिर बंद करण्याचे आदेश दिले असून साईबाबा संस्थान मध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून विविध विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी साईबाबाच्या श्रद्धा व सबुरी या वचनाप्रमाणे काम करत साई भक्तांना सोयीसुविधा व सेवा देण्याचे प्रामाणिकपणे काम करतात.

कोविड १९ च्या महामारीमध्ये अनेक कायम कंत्राटी, इंनसोर्स, आऊटसोर्स ,कंत्राटी कर्मचारी व त्यांचे कुटुंब कोरोनामुळे बाधित झालेले आहे. काही कर्मचारी रुग्णालयात दाखल झालेले आहे. या कर्मचाऱ्यांना रुग्णालय काळातील पूर्ण वेतन मिळावे. तसेच कायम कंत्राटी इंनसोर्स, आऊटसोर्स, कंत्राटी कर्मचारी यांचे ड्युटी कपातीमुळे ड्युटी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे हे कर्मचारी व त्यांच्या आधारित कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. घर भाडे घर खर्च वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक विवंचना निर्माण झालेली आहे.

कोरोनाच्या कालावधीत ड्युटी कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना या कालावधीतील मानवतेच्या दृष्टिकोनातून वेतन मिळणे बाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.२९/०५/२०२१ रोजी निवेदन दिलेले आहे. त्यानुसार दि.२६/०७/२०२१ रोजी वेतन देण्याचा आदेश पारित झालेला असून त्याप्रमाणे काही कर्मचाऱ्यांना वेतन अदा झालेले आहे. काही कर्मचाऱ्यांना आजअखेर पर्यंत वेतन मिळालेले नाही तरी यावर यथायोग्य कारवाई करून कोविड कालावधीत दिलेल्या सुट्टीचे दिवसाचे मानवतेच्या दृष्टिकोनातून वेतन देण्यात यावे, अशा आशयाचे पत्र भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सूर्यभान पवार यांच्यावतीने साईबाबा संस्थानच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here