पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त योजना लाभार्थ्यांचा सत्कार

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरला वाढदिवसानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून उत्तर नगर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने उत्तर नगर जिल्ह्यात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

राहता तालुका निमगाव कोर्‍हाळे येथे किसान सन्मान योजनेचे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी लसीकरणाचे लाभार्थी यांचा सत्कार करण्यात आला सत्कारा दरम्यान भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी देशात दोन कोटी 42 लाख प्लस एकाच दिवसात एवढी भव्य लसीकरण झाले असे सांगितले यावेळी उज्वला गॅस लाभार्थी यांचाही सत्कार करण्यात आला निमगाव ग्रामपंचायत च्या वतीने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला

covid-vaccination-at-shirdi

या कार्यक्रमाच्या वेळी ओबीसी मोर्चा ची जेष्ठ नेते खंडेराव कडलग भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष विजय गाडेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य वाल्मीक गाडेकर ओबीसी मोर्चा तालुका चिटणीस संतोष गाडेकर उपसरपंच अजय जगताप सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ भाऊ कातोरे भानुदास कातोरे सिकंदर शेख बंडू शेख राजेंद्र आव्हाड गणेश वालझाडे संतोष ढवळे रंजीत कडलग मनोज कुलाळ मंगेश कातोरे आरोग्य खात्याची कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे लाभार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here