पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साईआश्रया अनाथालयात फळ वाटप

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव देश सेवेत कार्यमग्न असतात. अनेक दशकानंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकार कडून ऐकले जात असून सर्वांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे. व देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने नेत आहेत. असे यशस्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा संघटन सरचिटणीस तथा शिर्डी नगरपंचायत च्या नगरसेविका सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर पाटील यांच्यावतीने साईआश्रया अनाथालयात फळ वाटप करण्यात आले.

यावेळी सौ. सुरेखाताई मंगेश रनमाळे, सौ. मनिषाताई सचिन शिंदे, सौ.सोनालीताई चेतन बनकर, सौ. प्रतिभाताई स्वानंद रासने,सौ. कस्तुराताई शाहु पटेकर,सौ. नंदिनीताई गव्हाणे, यांसह आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here