नाशिक (विशेष प्रतिनिधी) : आडगाव येथील राजवाड्यात बेकायदा देशी दारू विक्री करणा-या एकास पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली. संशयीताच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम भास्कर जाधव (४७ रा.राजवाडा आडगाव) असे संशयीत दारू विक्रेत्याचे नाव आहे. आडगाव येथील राजवाड्यात बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१७) पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून १८० मिलीच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पोलीस शिपाई विनोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.






