भरधाव कार उलटल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरूण ठार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील द्वारका भागात टॅक्टर हाऊस समोर भरधाव कार उलटल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरूण चालक ठार झाला. अपघात इतका भयंकर होता की, चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला जावून आदळली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज राजकुमार काहलकर (रा.दत्तनगर,चुंचाळे शिवार अंबड) असे मृत चालकाचे नाव आहे. सुरज काहलकर हा तरूण शनिवारी (दि.१८) आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मुंबई आग्रा महामार्गावरून धुळ्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना द्वारका भागात टॅक्टर हाऊस समोर भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरूध्द दिशेने येणाऱ्या मार्गावर जावून आदळली.

या अपघातात कार उलटल्याने सुरज गंभीर जखमी झाला होता. मित्र राहूल नागले याने धाव घेत तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here