कृषक कन्या विद्यालय,आर्वीचा उत्कृष्ट निकाल

वर्धा (आर्वी) (मनोज बाचले) – येथील कृषक शिक्षण संस्था अंतर्गत संचालित कृषक कन्या विद्यालय आर्वी चा इयत्ता 10 वी निकाल 98.29%लागला असून विद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या विद्यालयातून प्रथम कु.गार्गी पांडे हिला 97.60%, द्वितीय कु.मयुरी येंडे हिला 95.60%, तृतीय कु. गौरी जुनघरे हिला 95.20% तर कु. गौरी सुने 94.60% हिने चतुर्थ क्रमाक मिळवला. विद्यालयातून एकूण 118 विध्यार्थीनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या त्यात 74 प्राविनप्राप्त श्रेणीमध्ये,26 प्रथम श्रेणीत,13 व्दितीय श्रेणीत व 02 तृतीय श्रेणीत विद्यार्तींनी आल्या आहेत. यशस्वी विद्यार्तिनीचे कृषक शिक्षण संस्था ,आर्वी चे संस्था अध्यक्ष अँड.श्री.भैया साहेब काळे ,व कोषाध्यक्ष,सचिव सौ.अँड शोभाताई काळे व संस्थेचे पदाधिकारी श्री.संदिप भाऊ काळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा कदम ,वर्ग शिक्षक श्री दिनेश शेळके व श्री.उमेश फुलंबरकर सर सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थिंनींचे अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here