जळगाव (क्राइम रिपोर्ट शाहिद खान) : शहरातील हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनतर्फे बिर्ला व्हाईट कुट्टी कंपनीच्या बैठकीत सहभागी होवून बिल्डींग पेंटरकरिता इन्शुरन्स करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
बैठकीत बोलताना अध्यक्ष ईस्माईल खान यांनी पेंटर बांधवांना इन्शुरन्सची असलेली गरज व कंपनीने त्याबाबत करावयाचे सहकार्य याबाबत कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
निवेदन देतेवेळी हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईस्माइल खान, जिल्हा सचिव शरीफ पठाण, दगडू दादा, जिल्हा सल्लागार अकील बाबा, आमिर मिरची, जिल्हा संपर्कप्रमुख अहमद खान, रतन पवार, अजमल खान, बंटी पेंटर, खलील शहा, महेशभाऊ, ईकबाल भाई, रोशन शहा, अन्वर शेख, रिजवान पेंटर आदी उपस्थित होते.






