धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन कविवर्य ना.धों.महानोर यांच्याकडे द्वारदर्शनाला

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : पद्मश्री पुरस्कार प्राप्त कवी श्री ना.धों.महानोर यांच्या धर्मपत्नी सौ. सुलोचनाताई महानोर यांचे दुःखद निधन झाल्याने धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे दिनांक १३/९/२०२१ रोजी दुपारी १:०० वाजता सांत्वन करण्यासाठी व्दारदर्शन घेतले. त्या वेळेस श्री. महानोर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, की मी शिवछत्रपती शिवाजी महाराज.महात्मा फुले, सावित्री बाई फुले,बालकवी ठोंबरे ,साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, यांच्या विचारांनी प्रेरित होवून साहित्यक्षेत्रात कार्य करत आहे. योग्य संधी मिळाली त्या वेळेस मी कवी व लेखक म्हणून व्यक्त होत गेलो.

अश्या प्रकारे मी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी साहित्य संमेलन केली.त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यात विधानपरिषदेत आमदार म्हणून माझी निवड झाली.मी इसवी सन १९८३ साली महाराष्ट्र राज्यात मोसंबी या फळबाग साठी सर्वात प्रथम ठिंबक सिंचन योजना, माझ्या स्वतःच्या शेतात राबविली. विक्रमी उत्पादन घेतले त्या वेळेस अमेरिका जपान आणि इतर देशांच्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञानचे कृतिशील मार्गदर्शनाखाली लागवड केली होती. परंतु, सदर खर्च हा शेतकरी बांधवांना पेलणार नसल्याने, हा विषय मी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत मांडला. ठिंबक सिंचन योजना ही जगातील सर्वात कमी पाण्यात पिकांचे उत्पादन कसे येणार या आशेवर मी स्वतः अनुभवले असून, हे पटवून दिले.त्या विषयावर चर्चा केली व शेतकरी बांधवांना १०० टक्के सबसिडी ने योजना मंजूर करून घेतली.

याकामी शरदराव पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना फायदा झाला. या कालखंडात मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच महाराष्ट्र राज्य चे कृतिशील नेतृत्व असलेले शरदराव पवार यांच्या प्रेरणेने मला महाराष्ट्रातील व भारतातील शेतकरी बांधवांना फायदा करून देण्याचे काम माझ्याकडून झाले.तसेच इसवी सन १९९१-९२साली साहित्य शेत्रात काम करीत असताना धरणगाव येथील श्री बालकवि ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉक्टर व्हि.आर.तिवारी व शहरातील नागरिकांच्या मदतीने आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने घेतला. भरपावसात शहरातून मिरवणूक काढून बालकवी ठोंबरे जयंती साजरी करण्यात आली होती.आणि मी लिहिलेल्या कविता लेखन यांचे गायन गानकोकिळा पद्मश्री पुरस्कार प्राप्त लताताई मंगेशकर यांनी गायलेले आहे त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.”जांभुळ पिकले झाडाखाली ” या ओळींची सुंदर ओळी म्हणून दाखवली.

शेवटी त्यांच्या मनोगतातून महाराष्ट्र राज्याचे कृतिशील विचारवंत नेतृत्व असलेले शरद पवार यांच्याअंगी असलेल्या गुणांचा देशपरदेशात फार महान व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहे त्यांचे जीवनातील रहस्य अजूनही जनतेने समजून घेतले पाहिजे ते जर एकवेळ पंतप्रधान बनले तर देशातील शेतकरी बांधवांना विकास बघण्यासारखे राहील त्यांच्या कामाची पध्दत शरद पवार यांच्या शब्दानेसुरुवात झाले कि गती मिळते असे मी स्वतः अनुभवले आहे. हे आता पर्यंत जनतेने आजही आळखळे नाही अशी खंत व्यक्त केली. खान्देशात बालकवींची जन्मभूमी धरणगावात आहे हे भाग्य आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे व व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी हे सलग ३० वर्षे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला तोड नाही. बालकवींचे स्मारक लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी मांडली. असो अशा महान व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती माननीय पद्मश्री पुरस्कार प्राप्त कवी श्री ना.धो.महानोर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here