जळगाव जिल्ह्यात आज आढळले ३८५ कोरोनाबाधित रूग्ण

शहरात सर्वाधिक ७३ रूग्ण तर जिल्ह्यातील १२ कोरोना रूग्णांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीच्या आज (दि.५) मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ३८५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १२ हजार ७६६ झाली आहे. सर्वाधिक ७३ कोरोबाधित जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने, नागरिकांची चिंता वाढत आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ७, धरणगाव ३८, यावल ४, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ३, पारोळा ४, चाळीसगाव १५, बोदवड २ इतर जिल्ह्यातील २ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जळगाव तालुका, रावेर तालुक्यात प्रत्येकी ३, चोपडा तालुक्यात २, धरणगाव तालुक्यात एक अशा रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here