कौटुंबिक वादातून जुहूत भावाने केली भावाची हत्या

knief-attack

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : कौटुंबिक वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना जुहू परिसरात घडली. विनोद बारिया असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी राजा बारियाला जुहू पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, विनोद आणि राजा हे दोघे सख्खे भाऊ असून ते विलेपार्ले परिसरात राहत असून ते दोघे रिक्षाचालक आहेत. त्या दोघांना दारूचे व्यसन असल्याने घरखर्चाला पैसे देण्यावरून त्या दोघांमध्ये वाद होत असायचा. शुक्रवारी सकाळी राजा आणि विनोदमध्ये वाद झाला. रागाच्या भरात राजाने विनोदवर चाकूने हल्ला केला. चाकूहल्ल्यात विनोद हा जखमी झाला.

विनोद रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर जुहू पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी विनोदला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विनोदला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here