जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेणा-या दोघे आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पोलिस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंडे यांना जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर महिती दिली.
संदीप रोहिदास सोनवणे (नाशिक) व सतीश गोविंदा चौधरी (मालेगांव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघे आरोपींची नाव आहे दोघे आरोपींनी जळगाव शहरातील रामानंद नगर व जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतुन प्रत्येकी चार असे एकुण आठ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. गेल्या सुमारे नऊ महिन्यातील एकुण आठ गुन्हे दोघा आरोपींच्या अटकेनंतर उघडकीस आले आहेत. महिलांच्या गळ्यातील साखळी चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असतांना तपासकाम देखील त्याचे वेगाने सुरू होते. १३ ॲगस्ट रोजी जिल्हापेठ हद्दीत सोनसाखळी चोरीची घटना घटल्यांतर लागलीच- दुसर्य दिवशी औरंगाबाद शहरात देखिल तशीच घटना घडली होती. आरोपी औरंगाबादच्या दिशेने घेले असावेत असा अंदाजा लावण्यात आला होता.
दरम्यान जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक ४ दिवस नाशिक शहरात तपासकामी मुक्कामी होते. तेथील तपासात दोन आरोपी पथकाला गवसले. संदीप सोणवने हा नाशिक शहरातील असुन दुसरा सतीश चौधरी हा मालेगाव येथील रहिवासी आहे. या आरोपींच्या माध्यामातुन अनेक गुन्हे उघडकिस येण्याची श्कयता आहे. दोघा आरोपींकडुन चोरीस गेलेल्या सोनसाखळीच्या मुद्दे माला हस्तगत करणयाची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्हाचा तपासकामी पोलीस नाईक सलीम तडवी, रविंद्र साबळे, विकास पहुरकर, समाधान पाटिल, या़नी सहाभाग घेतला. पत्रकार परिषदेला पोलिस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंडे, व पो. नि. रामदास वाकोडे तसेच त्यांचे सहाकारी। हजर होते.






