धारावीतील दहशतवादी जान शेखच्या हँडलरला एटीएसने केले जोगेश्वरीत जेरबंद

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : देशात घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी गजाआड केल्यानंतर पोलीस यंत्रणा ऑक्टिव्ह झाल्या आहेत. मुंबई एटीएसने शुक्रवारी जोगेश्वरी येथून झाकिर हुसेन शेख याला उचलला. झाकिर हा दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या टेरर मॉडय़ूलशी संबंधित असण्याची तसेच तो शेजारील देशातील कोणाच्या तरी संपका&त होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते.

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना पकडले त्यात धारावीत राहणाऱया जान शेख उर्फ समीर कालिया याचा समावेश आहे. जान हा दाऊद टोळीच्या संपर्कात होता. २०१९ मध्ये तो फईम मचमचच्या सांगण्यावरून बहरिन येथे छोटा शकिलचा पंटर अली बुदेश याची हत्या करण्यासाठी गेला होता. तसेच तो अन्य पाच दहशतवाद्यांच्या साथीने देशात घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली असताना मुंबई एटीएसने शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून झाकिर शेख याला उचलले.

अटक करून आज कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, झाकिर हा देखील अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. शिवाय दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या सहा दहशतवाद्यांशीदेखील तो संपका&त होता. झाकिरने जान शेखला हत्यार आणि स्पह्टकांची डिलिव्हरी घेण्यास सांगितले होते, अशीही माहिती समोर येत असल्याचे पोलीस सूंत्राकडून सांगण्यात येते. याबाबत एटीएस अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here