मुंबईतील सराफाच्या तब्बल सव्वा कोटींच्या ३ किलो सोन्यावर दोन महिलांचा डल्ला

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पुण्यातील सराफी व्यावसायिकांना सोने पुरविण्यासाठी आलेल्या मुंबईच्या व्यापाऱ्याकडील सव्वा कोटींचे 3 किलो 139 ग्राम सोने लंपास करण्यात आल्याची घटना रविवार पेठेत घडली. एका सराफी दुकानात व्यापाऱ्याशी बोलत असताना तेथे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी डल्ला मारत हा ऐवज लांबवला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश बोराना (वय ३३) यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. ते विविध जिल्हे आणि शहरातील सराफी व्यापाऱ्यांना सोने पुरवितात. शनिवारी दुपारी ते मुंबईवरून पुण्यात आले. त्यांचे नेहमीचे ग्राहक असलेल्या रविवार पेठेतील सराफी मित्राच्या दुकानावर जाऊन ते व्यवसायाची बोलणी करीत होते. त्यांनी त्यांची पांढऱ्या रंगांचे प्लास्टिक बॉक्स जवळच ठेवलेले होते. या बॉक्समध्ये ३ किलो १३९.४० ग्रॅम सोने होते.

दोघे ओळखीचे असल्याने, त्यांच्या गप्पा सुरु असतानाच या दुकानात खरेदीसाठी दोन महिला व लहान मुलगा आला होता. त्यांनी व्यापाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत सव्वातीन किलो सोने असणारा बॉक्स लंपास केला आहे. सराफ जिग्नेश बोराना यांच्या फिर्यादीवरून पोलिसानी दोन महिलांसह एका लहान मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here