ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राने दाखवला जाहिरातीत अभिनयाचा जलवा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला महिन्याहून अधिक काळ लोटला असला, तरी या यशामुळे अजूनही भारतीयांच्या तोंडी त्याचेच नाव आहे. त्यातच नीरजने एका नव्या जाहिरातीत केलेल्या अभिनयाने देशवासियांना चकित केले आहे.

सुवर्णकामगिरीनंतर अनेकजण नीरजला आपल्या कंपनीचा चेहरा बनवण्यासाठी उत्सुक आहेत. याच संकल्पनेला धरुन क्रेडिट कार्डच बील भरण्यासाठी उपयोगी असणाऱ्या ‘क्रेड’ या अॅपने त्यांच्या जाहिरातीत नीरजकडून अभिनय करवून घेतला आहे. मागील वर्षीपासून बाजारात आलेल्या या अॅपमध्ये अनेक खेळाडू तसेच अभिनेते काम करत असतात. त्यातच आता नीरजने देखील या अॅपच्या जाहिरातीत काम केलं आहे.

१९ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ही जाहिरात प्रदर्शित झाली असून नीरजने स्वत:ही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये नीरज स्वत: वेगवेगळ्या रुपात दिसत असून समाजातील अनेक जण नीरजच्या यशाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन घेण्याचा वापर कशाप्रकारे करत आहेत. ते दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here