खान्देशातील सुप्रसिद्ध चित्रकार सुनिल दाभाडे यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : इंदोर येथील रडार संस्थेमार्फत लाँकडाऊन मधिल कोरोना महामारी च्या काळात सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून पूर्ण जगातील 112 देशामधिल नामवंत कलाकारांना फेसबुक च्या माध्यमातून एकत्रित करुन एकूण 1149 चित्र (पेटिंग) साकारले.ही चित्रे एका तासात फेसबुकवर अपलोड करावयाचे होते .त्यात जळगांवातील मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक सुनिल न्हानू दाभाडे,व ललवाणी काॅलेज कलाशिक्षक चंद्रकांत कोळी

कलावंताचा यात सहभाग होता. यांच्या चित्रांची निवड थेट गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.हा खान्देशातील जळगांव जिल्हाचा सह महाराष्ट्राचा गौरव आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कडून बहुप्रतीक्षित प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक मिळाले आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डाॅ आर एस डाकलियाजी यांचा शुभहस्ते चित्रकार सुनिल दाभाडे यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर , बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी या आधी सुध्दा ज्वारीचा भाकरी वर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पेटींग काढली होती ती पेटींग जगातील पहिली पेटींग ठरली आहे. यांची OMG NATIONAL BOOK OF RECORDS मध्ये नोंद घेण्यात आली आहे .

sunil-dabhade-with-guniss-book-of-record

सुनिल दाभाडे अवलिया शिक्षक शिक्षक आहे.त्यांनी कोरोना चा काळात चौका चौकातजाऊन स्वखर्चाने रस्त्यावर चित्र काढून जनजागृती केली आहे तसेच अनेक ठिकाणी घोषवाक्य ही लिहिले आहे. तसेच कोरोनाचा काळात गोरगरीब लोकांना जेवन , कपडे , मास्क,लहान मुलांना ही खाऊ वाटप केले आहे.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल चित्रकार सुनिल दाभाडे यांचे डायट काॅलेज चे माजी.प्राचार्य निळकंठ गायकवाड,माजी शिक्षणाधिकारी,कवी,साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर,माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर, मा.दिगंबर कट्यारे, विद्यानिकेतन मुख्याध्यापक यशवंत मोरे,चित्रकार प्रेमकुमार सपकाळे,चित्रकार सचिन मुसळे,चित्रकार शाम कुमावत,चित्रकार निरंजन शेलार,चित्रकार अविनाश मोघे,चित्रकार मनोज जंजाळकर, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे,जनमत चे अध्यक्ष पंकज नाले, आ.पा.महासंघाचे संस्थापक आप्पासाहेब साळुंखे,महासचिव रा.ना.सोनवणे, आ.पा.महासंघाचे उपाध्यक्ष मुकेशभाऊ साळुंखे,आ.पा.महासंघाचे खान्देश अध्यक्ष दिपक खांदे,कार्याध्यक्ष उखर्डू साळुंखे,सल्लागार पंडितराव सोनवणे,शहर अध्यक्ष सुकदेव मावळे,कोषाध्यक्ष बाबुलाल खांदे,अनिल चव्हाण,विजय चव्हाण, विजय पवार (नाशिक),ग्राम सदस्य सागर पारधी,देविदास सोनवणे,अक्षय आढारे,दिपक पवार (दिल्ली) प्रेमकुमार मावळे,संदेश मावळे, आदित्य चव्हाण , संदीप पवार,मनोज बावस्कर,गिरीश जाधव,दिनेश बाविस्कर,विकास चौधरी या सर्वानी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here