सलग पावसामुळे यसगाव धरणातील पाणीसाठ्यात ६३ टक्क्यांची वाढ; पाण्याची आवक सुरूच

बाजार सावगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील येसगाव धरणात आवक सुरुच असून, श्रावण महिना संपत आला, परंतु रविवारी (ता.०५) रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या जोरदार व दमदार पावसामुळे ,येसगाव धरणात ६२% टक्क्यांची भरघोस वाढ झाली असून पाण्याची आवक सुरू आहे.

एकाच पावसात ६२ टक्क्यांपर्यंत पाण्याची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यसगाव येथील गिरिजा धरण शंभर टक्के भरेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस मका सोयाबीन व उसाची लागवड केलेली आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व श्रावण महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात अल्पशी वाढ होऊन जवळपास ५०% टक्केच पाणीसाठा उपलब्ध होता.

येसगाव धरण तहानलेलेच असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या होत्या. धरण भरण्याची व जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी पहाटेपर्यंत धो-धो बरसला. धरण कार्यक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणात एकुण उपयुक्त पाणीसाठा ६२ टक्के इतका झाला आहे, तर पाणीपातळी ४२९.४० मीटर एवढी झाली आहे. धरण कार्यक्षेत्रात असलेले छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले असुन पाण्याची आवक सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here