जयपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत धुळ्याच्या विजय देवरेंने पटकावले कुस्तीत ‘गोल्ड मेडल !

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : राजस्थान जयपूर येथे “यूथ गेम नॅशनल चॅम्पियन शिप 2021” या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील लहानशा सडगाव या गावातील राहिवाशी ‘विजय आबा देवरे, या तरूणांने राज्यस्तरीय कुस्तीच्या झालेल्या स्पर्धामध्ये गोल्ड मेडल मिळवून त्याने गावाचे नावासोबत जिल्हयाचे देखील नाव मोठे केले आहे. याच बरोबर आपल्या आई वडीलांचे नाव देखील गौरवान्वित केले आहे.

राजस्थानमधील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे असे जयपूर या शहराची ओळख सांगावी अशी काही गरज नाही कारण स्वत:ची प्रसिद्धी असलेले नाव आहे गुलाबी शहर जयपूर. येथील चित्रकूट स्टेडियम मध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत. 19 वर्षावरील वयोगटातील 86 किलोग्राम वजनातील. लढतीमध्ये ओपन गटातील ‘ कुस्तीपटू पैलवान ‘विजय आबा देवरे हा महाराष्ट्र कडून खेळत असताना हरियाणाच्या पैलवानाला अंतिम फेरीत धुळचारीत पराभूत केले.

vijay-devare

विजय आबा देवरे यांना याआधी नॅशनल गोल्ड मेडल मिळाले आहे. विजय आबा देवरे हे ग्रामीण भागातील धुळे जिल्ह्यातील एका लहानशा खेड्या गावातले रहिवाशी असून त्यांनी. अतिशय कठीण परिस्थितीत मेहनत करून. विजय मिळवला आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे महाराष्ट्राचा नावलौकिक झाला आहे. सध्या ते धुळे जिल्ह्यात सुरक्षा रक्षक या पदावर तैनात आहेत . आज धुळे येथे सुरक्षा रक्षक मंडळाच्या‌ अधिकाऱ्यांनी विजय आबा देवरे यांचा शाल देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या या यशाचे सर्वांकडून कौतूक करण्यात येत आहे. यावेळी धुळे कामगार मंडळ सचिव रोहीकर साहेब, साह्हायक कामगार आयुक्त च.ना. बिरार, निरीक्षक बोडरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here