जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगांव येथे केंद्र व राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व गुलाबराव वाघ यांचा प्रयत्नाने भावसार मढ़ी येथे लसीकरणाच्या ठिकाणी धरणगांव येथील राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी लस घेतली.
यावेळी उपस्थितांशी बोलतांना ते म्हणाले की, तुम्हीं कोरोना लसीबाबत कोणत्याही खोटया भुलथापावर बळी पड़ू नका कोरोना या विषाणू पासून आपल्याला व आपल्या परिवाराचा संरक्षण मिळण्यासाठी लस हा अतिशय उत्तम असा उपचार असुन अंधश्रद्धावर विश्वास ठेऊ नका जास्त करून मुस्लिम बांधवानी सुद्धा स्वताहुन पूढ़े येवुन लस घ्यावी.मी लस घेतली आहे, तुम्हीही घ्या.

सदर लसीकरण केंद्रावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम.पाटील, शहर प्रमुख राजेन्द्र महाजन,उपनगराध्यक्षा सौ कल्पनाताई महाजन,विलास महाजन, माजी नगरसेवक बापू चौधरी, गट नेते पप्पू भावे, नगरसेवक भागवत चौधरी,अरविंद चौधरी, गोलु चौधरी पदाधिकारी उपस्थित होते.






