सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रकाश भिलारे

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्ट (आंबेगाव बुद्रुक)ची गणेशोत्सव अहवाल बैठक आणि नवीन कार्यकारिणी निवड बैठक १९ सप्टेंबर रोजी झाली.या बैठकीत नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात येऊन अध्यक्षपदी प्रकाश भिलारे यांची निवड झाली.

याबरोबरच नूतन कार्यकारिणीत आशा गाढवे(उपाध्यक्ष), प्रकाश शेटे(सचिव), नितीनकुमार तुपे (खजिनदार), सचिन शिर्के(सहसचिव), विलास टोपे(सह खजिनदार) यांची नियुक्ती झाली. विजय गायकवाड,सुनीता नलावडे,दीपक शिंदे,सोनल वामन यांना कार्यकारिणीच्या सदस्य पदी नियुक्त करण्यात आले आहे.

श्री गणेश अपार्टमेंट,हेरंब अपार्टमेंट या गृहनिर्माण संस्थांचा हा ट्रस्ट आहे.या संस्थांच्या एकत्रित सर्वसाधारण सभेत श्री गणेश अपार्टमेंट,हेरंब अपार्टमेंट या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.श्री गणेश अपार्टमेंटच्या अध्यक्षपदी नीलम भिलारे यांची नियुक्ती झाली.सुनील बोरगे(सचिव),सुहास पळसे (खजिनदार),संतोष भांदिर्गे(सहसचिव),नानासाहेब जगताप (सह खजिनदार),राहुल सैकिया(सदस्य),अर्चना पाभळकर (सदस्य),नरेंद्र परदेशी (सदस्य) यांची निवड झाली. तर हेरंब अपार्टमेंटच्या अध्यक्षपदी प्रदीप गाढवे यांची निवड करण्यात आली.

उज्वला शिर्के(सचिव),प्रकाश शेटे(खजिनदार),संभाजी शेलार(सह सचिव),दीपक शिंदे(सह खजिनदार) यांची निवड करण्यात आली. या सभेत गणेशोत्सव आढावा,सोसायटी नोंदणी,कामांची देखरेख,खर्चाचे नियोजन यावर चर्चा झाली.सोसायटी नोंदणीसाठी सुनील हाडके यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here