२४ व २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे कार्यकर्ता शिबिर

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील शासन मान्यता प्राप्त ग्रंथालय कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले असून वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सदर शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास खा अनिल देसाई सचिव शिवसेना,मा.सुभाष देसाई मंत्री, ना.गुलाबराव पाटील मंत्री,ना.उदय सामंत मंत्री,ना.एकनाथ शिंदे मंत्री, मा.सचिन भाऊ अहिर माजी मंत्री, आ.रविंद्र वायकर माजी मंत्री,मा.जयदत्त आण्णा क्षीरसागर माजी मंत्री, आ.सदा सरवणकर, श्रीमती शिल्पाताई सरपोतदार इत्यादी यावेळी उपस्थित राहणार आहे.

ग्रंथालय सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रंथालय सेना उपप्रमुख पी एम पाटील सर,जिल्हा प्रमुख डॉ प्रशांत पाटील,अरुण मोरे,सुनील जाधव, अरुण पाटील दिलीप पाटील रवींद्र पाटील भरत चौधरी श्रीकांत पाटील दिलीप पाडगावकर त्यांनी केले आहे, असे प्रसिद्धी पत्र योगेश पी.पाटील ग्रंथालय सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जळगाव यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here