बनावट किल्लीने दार उघडून पोलिसाच्याच घरात चोराचा डल्ला

THIEF

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस लाइनमध्ये बनावट किल्लीने कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३१ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.

याबाबत पोलीस कर्मचारी प्रशांत चंद्रकांत शेवाळे (वय २६ रा.पोलीस मुख्यालय लाइन नंबर २०, खोली नं. ५) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस मुख्यालयातील लाइनमधील घरात प्रशांत शेवाळे राहात असून, ते शनिवारी रात्री घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. रविवारी दुपारी १२ वाजता घरी आले असता, त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञाताने बनावट किल्लीने काढून रूममधील सुमारे ३१ हजार ८६४ रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी सोमवारी रात्री उशिरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here