आईवडीलांसह बहिण आणि घरातील कुत्र्याला संपविल्यानंतर त्याने एफबीवर शेअर केले फोटो

टेक्सास (अमेरिका) : येथे एका १५ वर्षीय मुलाने एका चित्तथरारक हत्याकांड घडवून आणलं आहे. या मुलाने आईवडील, बहिण आणि घरातील पाळीव कुत्र्यांचीही निर्दयी हत्या केली आहे. मुलाने या सगळ्यांना गोळ्या मारून ठार केले त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली आहे. एकाच घरात ४ मृतदेह पाहून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही.

मिरर यूकेच्या माहितीनुसार, टेक्सासमध्ये एका १५ वर्षीय युवकाने आई वडील आणि लहान बहिणीची हत्या केली आहे. इतकचं नाही तर त्याने या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर युवकाने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. युवकाने त्याच्या ५३ वर्षीय आई जाना कोलबर्गला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच गोळी मारली. त्यानंतर वडील विलियम कॉलबर्ग जे ६३ वर्षाचे होते आणि १३ वर्षीय लहान बहिण एम्मा हिच्या गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर मुलाने घरात दोन पाळीव कुत्रे होते त्यांनाही गोळी घालून मारून टाकलं आहे.

त्यानंतर स्वत:चा जीव घेण्यापूर्वी युवकाने सर्व मृतदेहांचे फोटो ऑनलाईन सोशल मीडियावर पोस्ट केले. हे पाहून त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेकजण हैराण झाले. एका मित्राने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस युवकाच्या घरी पोहचले तेव्हा समोरील दृश्य पाहून सगळेच हादरले. सोशल मीडियावर मृतदेहांचे फोटो शेअर केल्यानंतर आणि स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी मुलाचा पत्ता शोधून काढला आणि तात्काळ त्याच्या घरी पोहचली. पोलीस अधिकाऱ्यांनी युवकाला बाहेर येण्याचं आवाहन केले परंतु तो बाहेर आलाच नाही.

यावेळी अचानक गोळीचा आवाज ऐकायला मिळाला त्यानंतर सगळं काही शांत झालं. पोलिसांनी आत जाऊन पाहिलं असता युवकाने स्वत:वर गोळी झाडली होती. घटनेच्या वेळी घराबाहेर आलेले युवकांच्या नातेवाईकांनी सांगितले की, या ह्दयद्रावक प्रकाराची माहिती मिळाल्यावर आम्हाला विश्वास बसला नाही. अखेर युवकाने हा टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध घेतला जात आहे. पोलीस सध्या या घटनेची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here