मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लांबविणाऱ्या दोन चोरांना पोलिसांना गजाआड केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक पाटील हे त्यांच्या पत्नीसह भाईंदरला जाण्यासाठी शीव येथील बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते. दरम्यान सी-७२ ही बस येताच पाटील व त्यांची पत्नी बसमध्ये चढले. पाटील यांनी मोबाईल खिशात आहे का पाहिले असता तो नसल्याचे व एक तरुण घाईघाईत उतरून जाताना त्यांच्या निदर्शनास पडला. त्यामुळे पाटील यांनी चोर चोर अशी आरडाओरड करताच नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
राहुल कुमार महातो (१९) असे नाव आहे. त्याच्यावर लोकलमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २० तारखेला शीव पोलिसांनी शिवकुमार पटेल (२०) या चोराला बेस्ट बसने प्रवास करणाऱया एका महिलेचा मोबाईल चोरताना पकडले. दोन्ही आरोपींकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.






