धरणगांव (तालुका क्राइम रिपोर्टर ज्ञानेश्वर महाडिक) : पाळधी ता. धरणगाव रविवारी (दि.१९) सकाळी चार वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावदे ता. एरंडोल येथे पाळधी दूरक्षेत्र पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली.
नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील अवैधरित्या शस्त्र बागडणे व अमली पदार्थ तस्करी करणे बाबत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना दिले असता जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली.
पाळधी आऊटपोस्टचे सपोनि गणेश बुवा व पाळधी पोलीस यांनी मोहिमेअंतर्गत रात्री गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत असताना सावदे तालुका एरंडोल या शिवारात चार तरुण गावठी पिस्तोल घेऊन देवन करत असताना रंगेहात पकडले यावेळी एक आरोपी फरार झाला व तीन आरोपी पकडण्यात आले.
पकडण्यात आलेल्या आरोपी क्रमांक एक सुनील बापू सोनवणे वय २५ व दिलीप हिरामण सोनवणे वाय २६ वर्ष राहणार सावदे तालुका एरंडोल व किरण मालचे वय १७ राहणार मेहुणबारे तालुका चाळीसगाव यांच्याकडून झडती घेतली असता दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस तसेच दोन मोटर सायकल एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौथा आरोपी काल्या उर्फ भूषण तुकाराम मोरे राहणार परधाडे तालुका पाचोरा हा फरार झाला असून त्याचा शोध पाळधी पोलीस घेत आहे.
याकामी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा व हेड कॉन्स्टेबल नसीम तडवी विजय चौधरी संजय महाजन अमोल पाटील गजानन महाजन अरुण निकम दत्तात्रय ठाकरे ज्ञानेश्वर बाविस्कर उमेश भालेराव.
सदर आरोपी यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे धरणगावला गुन्हा दाखल केला असून आरोपींना कोर्टात हजर केले असता 22 तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.






