जळगावातील काल दुपारी बेपत्ता झालेले डॉ. कुणाल नारखेडे पहाटे घरी परतले

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश पाटील) : शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील खाजगी हॉस्पीटलमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कामाला असणारे डॉ. कुणाल नारखेडे हे काल दुपारी अचानक बेपत्ता झाले होते. जातांना त्यांनी आपला मोबाईल व गाडीची किल्लीदेखील हॉस्पिटलमध्ये ठेवल्याने, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र रात्री ३ वाजता ते घरी परतले यामुळे त्यांच्या घरच्या मंडळीनी सुटकेचा श्र्वास सोडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील डॉ. कुणाल नारखेडे हे बीएसएनएल कार्यालयाच्या समोर एका खाजगी हॉस्पीटलमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कामाला आहेत. त्याच्या पत्नी शहरातील शाहुनगर हाँस्पिटल येथे डॉक्टर आहे. काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉ.कुणाल नारखेडे वीस मिनीटात परत येतो असे रिसेप्शन काऊंटरवर सांगून आपला मोबाईल तिथे देऊन बाहेर पायी चालत गेले होते. त्याची फोरव्हीलर गाडीपण घेऊन गेले नाही.

वडील व पत्नी डॉक्टर यांनी त्याचा मित्रमंडळीसह नातेवाईकांनकडे शोध घेतला परंतु ते न सापडल्याने रात्री १० वाजता त्याच्या वडिलांनी डॉ. कुणाल नारखेडे हे हरविल्याची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये केली. रात्री ३ वाजता डॉ.नारखेडे घरी सुखरूप पोहोचले. त्यांना विचारले असता एस.टी.स्टॅण्डवरून पायी आलो ह्याव्यतिरिक्त अजून त्यांनी काहीही माहिती दिली नसल्याचे त्यांच्या मित्रमंडळी कडून आज सकाळी समजले. डॉ कुणाल नारखेडे कुठे गेले होते, संपूर्ण दिवस व रात्री तीनपर्यंत ते कोठे होते? हे मात्र अद्याप समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here