पती पत्नीत झाला ५०० रुपयांच्या नोटेवरुन वाद; मेहुण्याने केला भाऊजीचा खून

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) : येथे केवळ ५०० रूपयांबाबत पत्नीला विचारणा केल्यावरून पती पत्नीत झालेला वाद इतका वाढला की, सासरच्या लोकांनी त्याच्या घरी पोहोचत पतीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या भावाने आपल्या साथीदारांसोबत भाओजीला इतकी मारहाण केली की, यात त्याचाचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत आरिफचं ८ वर्षापूर्वी छोलस गावातील एमनसोबत लग्न झालं होतं. आरिफ मिस्त्रिचं काम करत होता. १८ सप्टेंबरला आरिफकडून ५०० रूपयांची नोट कुठेतरी हरवली होती. आरिफने ५०० रूपयांची नोट न सापडल्याने त्याबाबत पत्नीला विचारणा केली. पण यावरून पत्नीने त्याच्यासोबत भांडण सुरू केलं. दोघांमधील वाद इतका वाढला की, रागात आरिफच्या पत्नीने माहेरच्या लोकांना फोन लावला आणि त्यांना घरी बोलवून घेतलं. आरिफचा मेहुणा नदीम आपल्या काही मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्याने आपल्या आरिफला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरिफची हालत खराब झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

मारहाणीच्या या घटनेनंतर आरिफच्या नातेवाईकांनी मृतकाचा मेहुणा नदीमसहीत काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गंभीरपणे जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here