पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस तर्फे इनोव्हेशन आणि एक्सलन्स या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल .इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. रोशन काझी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या चर्चासत्रात डॉ. अर्चना सिंग ,ओमकार परुळेकर, स्वर्ण प्रिया, मेहदी जाफरी हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.






