पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.
महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा चुलत दीर तुकाराम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मित्राच्या मदतीने आधी अत्याचार करुन मग वहिनीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती आहे.
आरोपी चुलत दीर तुकाराम याने वहिनीला देहू रोड जवळील घोरवडेश्वर येथील मंदिर पाहण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले. तुकारामने मित्र अक्षयला ‘आपण मज्जा करु’ असे सांगून बोलवून घेतले. त्यानंतर दीर तुकाराम आणि त्याचा मित्र अक्षय या दोघांनी घोरवडेश्वर येथील डोंगरावर घेऊन जाऊन वहिनीवर बलात्कार केला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून, चेहऱ्यावर दगड टाकून तिची हत्या केली.






