योगा प्रशिक्षक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

 पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मिस पिंपरी चिंचवड स्पर्धेची विजेती असलेल्या योगा प्रशिक्षक महिलेने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. सांगवी येथे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

विशाखा दीपक सोनकांबळे (वय ३७, रा. सांगवी), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाखा या त्यांचे पती दीपक तसेच दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी यांच्यासोबत सांगवी येथे भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये राहण्यास होत्या. रविवारी रात्री त्यांचे पती दीपक हे मुलगा व मुलगी यांच्यासह घराच्या हॉलमध्ये झोपले. त्यानंतर विशाखा यांनी बेडरुममध्ये डाव्या हाताची शीर कापली. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला.

पती दीपक यांना ही बाब सकाळी उठल्यावर निदर्शनास आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशाखा यांना औंध उरो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विशाखा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. दरम्यान सोनकांबळे यांच्या घरातील डायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली आहे. विशाखा सोनकांबळे या योगा प्रशिक्षक म्हणून योगाचे क्‍लास घेत होत्या. तसेच मिस पिंपरी-चिंचवड या स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here